वेब सीरीज रुद्र द एज ऑफ डार्कनेस का ट्रेलर रिलीज(“Rudra - The Edge of Darkness"). इस वेब सीरीज से अजय देवगन (Ajay Devgn, Digital Debut) कर रहे हैं डिजिटल डेब्यू. रुद्र में अजय एक बार फिर कॉप लुक में नजर आ रहे हैं . अजय के अलावा में राशि खन्ना (Raashi Khanna), ईशा देओल (Esha Deol), अतुल कुलकर्णी, अश्विनी कालसेकर, तरुण गहलोत, आशीष विद्यार्थी और सत्यदीप मिश्रा प्रमुख भूमिकाओं में नज़र आएंगे. ‛रुद्र- द एज ऑफ डार्कनेस’ ब्रिटिश वेब सीरीज ‘लूथर’ की रीमेक है. ('Rudra - The Age of Darkness' is a remake of the British web series 'Luther'.)
बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर व
चिटणीस अजय शिर्के यांना लोढा समितीच्या शिफारशीनंतर सुप्रीम कोर्टाने
पदावरुन हटवलं आहे. अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षपदावरून हटण्याने पुढील अध्यक्ष
कोण याची चर्चा सुरु झाली आहे. अध्यक्षपदासाठी सौरव गांगुलीचे नाव पुढे येत होते.
पूर्व क्रिकेटपटू व महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी बीसीसीआयचे
अंतरिम अध्यक्ष म्हणून भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नावाचे समर्थन केले
होते, त्यांनी
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सौरव गांगुलीच्या
नावाचे समर्थन केले होते. सुनील म्हणाले होते कि 1999-2000 मध्ये भारतीय क्रिकेट संघ
मॅच फिक्सिंगमध्ये अडकला होता , त्यावेळी गांगुलीकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले होते आणि
त्याने कुठलेही दडपण न घेता सर्व काही बदलून दाखवलं,” त्यामुळे या पदासाठी सौरव
गांगुली हेच नाव कायम माझ्या मनात येतं.
सुनील गावस्कर यांनी जरी सौरव
गांगुलीला समर्थन केले असले तरी सौरव यांनी यावर प्रतिक्रिया देताना
सांगितले कि बीसीसीआयचा अध्यक्ष बनण्यासाठी मी दावेदार नाही. टीम इंडियाचा माजी
कर्णधार आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला की, “बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी माझ्या नावाची उगाचच चर्चा सुरु आहे. बंगाल
क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षाच्या रुपात मी एकच वर्ष पूर्ण केलं आहे. आणखी दोन
वर्ष शिल्लक आहेत. त्यामुळे मी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा दावेदार नाही.”
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करावाच लागेल, असे संकेत गांगुली यांनी यावेळी दिले आहेत. लोढा समितीच्या शिफारशी बंगाल क्रिकेट मंडळ स्वीकारणार की नाही, या प्रश्नावर गांगुली म्हणाले की, ‘आम्ही बुधवारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या सर्व गोष्टींवर उद्या चर्चा केली जाईल.
सौरवच्या या प्रतिक्रियेनंतर पुढचा अध्यक्ष एखादा खेळाडू होणार कि दुसरा कोणी याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.


Comments
Post a Comment