वेब सीरीज रुद्र द एज ऑफ डार्कनेस का ट्रेलर रिलीज(“Rudra - The Edge of Darkness"). इस वेब सीरीज से अजय देवगन (Ajay Devgn, Digital Debut) कर रहे हैं डिजिटल डेब्यू. रुद्र में अजय एक बार फिर कॉप लुक में नजर आ रहे हैं . अजय के अलावा में राशि खन्ना (Raashi Khanna), ईशा देओल (Esha Deol), अतुल कुलकर्णी, अश्विनी कालसेकर, तरुण गहलोत, आशीष विद्यार्थी और सत्यदीप मिश्रा प्रमुख भूमिकाओं में नज़र आएंगे. ‛रुद्र- द एज ऑफ डार्कनेस’ ब्रिटिश वेब सीरीज ‘लूथर’ की रीमेक है. ('Rudra - The Age of Darkness' is a remake of the British web series 'Luther'.)
कॅप्टन कूल क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीने सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला आहे. टीम इंडियाच्या कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधारपद सोडले असले तरी महेंद्रसिंह धोनी वन डे आणि टी20 मध्ये खेळाडू म्हणून खेळत राहणार आहे.
बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने)एका प्रसिद्धीपत्रकातून ही माहिती दिली आहे.त्यामुळे आता धोनीची जागा कोण घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.धोनी कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर त्याची जागा कोण घेणार, याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.इंग्लंडविरोधात होणाऱ्या वनडे मालिकेसाठी उद्या टीम इंडियाची निवड होणार आहे. या सिलेक्शनसाठी महेंद्रसिंह धोनी उपलब्ध असेल. वनडे मालिकेसाठी विराट कोहलीकडे कर्णधारपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.महेंद्रसिंह धोनी हा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने 2007 साली दक्षिण आफ्रिकेमध्ये ट्वेन्टी- 20 विश्वचषक, 2011 साली भारतातील विश्वचषक, 2013 मध्ये इंग्लंडमधील चॅम्पियन्स ट्रॉफी, 2015 विश्वचषक मधील उपांत्यफेरी , 2016 ट्वेन्टी- 20 उपांत्यफेरी या जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे.
धोनीच्या नेतृत्वात भारताने 199 वनडे आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यापैकी 110 सामने तो जिंकला असून 74 सामने भारताने गमावले. कर्णधार म्हणून धोनी 72 टी20 सामने खेळला. त्यापैकी 41 सामन्यांत विजय तर 28 सामन्यात भारताला पराभव मिळाला.
धोनीने कर्णधार म्हणून वनडेमध्ये 86 च्या स्ट्राईक रेटने 6 हजार 633 धावा ठोकल्या आहेत. तर टी20 मध्ये धोनीने कर्णधार म्हणून 122.60 च्या स्ट्राईक रेटने 1 हजार 112 धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियात झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर महेंद्रसिंह धोनीने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत 30 डिसेंबर 2014 रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. महेंद्र सिंह हा नेहमीच आपल्या निराळ्या निर्णयासाठी ओळखला जातो.यावेळी ही त्याने निराळया पद्धतीने निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

Comments
Post a Comment