वेब सीरीज रुद्र द एज ऑफ डार्कनेस का ट्रेलर रिलीज(“Rudra - The Edge of Darkness"). इस वेब सीरीज से अजय देवगन (Ajay Devgn, Digital Debut) कर रहे हैं डिजिटल डेब्यू. रुद्र में अजय एक बार फिर कॉप लुक में नजर आ रहे हैं . अजय के अलावा में राशि खन्ना (Raashi Khanna), ईशा देओल (Esha Deol), अतुल कुलकर्णी, अश्विनी कालसेकर, तरुण गहलोत, आशीष विद्यार्थी और सत्यदीप मिश्रा प्रमुख भूमिकाओं में नज़र आएंगे. ‛रुद्र- द एज ऑफ डार्कनेस’ ब्रिटिश वेब सीरीज ‘लूथर’ की रीमेक है. ('Rudra - The Age of Darkness' is a remake of the British web series 'Luther'.)
धावांनी हरवून मालिका 4-0 ने आपल्या नावावर केली. तत्पूर्वी भारताने युवा खेळाडू करुण नायर (303 धावा) याच्या त्रिशतकाच्या आणि केएल राहुल (199 धावा) , अश्विन (67धावा), रवींद्र जडेजा (51धावा) यांच्या सर्वोत्तम खेळीच्या आधारे आपला पहिला डाव विक्रमी 7 बाद 759 धावांवर घोषित केला. त्यामुळे चौथ्या दिवस अखेरीस भारताला इंग्लंडवर 282 धावांची आघाडी मिळाली.या सामन्यात डावानं पराभव टाळण्यासाठी किंवा सामना अनिर्णित राखण्यासाठी इंग्लंडला 282 धावांची आवश्यकता होती. इंग्लंड ने त्या दृष्टीने डावास सुरुवात केली. चौथ्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी शिल्लक असलेल्या पाच षटकांमध्ये इंग्लंडने बिनबाद 12 धावा केल्या होत्या. आज पाचव्या दिवशी कॅप्टन अॅलिस्टर कूक (49धावा ) व किटन जेनिंग्स (54 धावा ) यांनी खेळाला सुरुवात झाल्यावर संयमीपणे खेळत उपाहारापर्यंत भारताला एकही यश मिळू दिले नव्हते.त्यामुळे इंग्लंडला ‘व्हाईटवॉश’ देण्याचे स्वप्न अधुरे राहणार अशी चिंता निर्माण झाली होती. पण उपहारानंतरच्या दुसऱ्या सत्रात रवींद्र जडेजाने कॅप्टन कूक (49धावा ) व किटन जेनिंग्स (54 धावा )यांना बाद केले. या दोघांनी बाद होण्यापूर्वी 103 धावांची भागीदारी रचली. या दोघांच्या बाद होण्याने इंग्लंड संघ स्वतःला सावरू शकला नाही. पुढे जडेजाने जो रुटला बाद करून संघाला तिसरे यश मिळवून दिले. जडेजाच्या फिरकीवर जो रुट पायचीत झाल्याची अपील भारतीय संघाने केली होती. पण पंचांनी त्यास नकार दिला. मग भारताने डीआरएस प्रणालीचा वापर केला. यात भारताला यश प्राप्त झाले व रिव्ह्यूमध्ये जो रुट बाद नसल्याचे निष्पन्न झाले. विकेट्स मिळवण्यासोबतच जडेजाने आज एक अप्रतिम झेल टीपला. जडेजाने डीप मिड विकेटच्या दिशेने धावत बेअरस्टोचा झेल टीपला आणि इंग्लंडला चौथा धक्का बसला.चहापानाला इंग्लंडचा संघ चार बाद 167 धावांवर संघर्ष करत होता.
तिसऱया सत्रात जो रुटनंतर मोईन अली (44 धावा ), जडेजाच्या फिरकीवर मोठा फटका मारताना झेलबाद झाला. मोईन पाठोपाठ बेन स्टोक्सला(23 धावा ) जडेजाने बाद केले. मग अमित मिश्राने आपली फिरकी जादू दाखवत इंग्लंडच्या लियम डॉसन याला क्लीनबोल्ड करुन शून्यावर बाद केले. भारताने आक्रमक क्षेत्ररक्षणक करत इंग्लंडवर दबाव निर्माण करण्यात यश मिळवले व आदिल रशिद (2) स्टुअर्ट ब्रॉड (1) आणि जॅक बेल (0) यांना झटपट बाद करत विजय मिळवला. इंग्लंड चे बाकीचे खेळाडू भारतीय गोलंदाजी समोर टिकू न शकल्याने सामन्यातील नऊ षटकांचा खेळ शिल्लक असतानाच इंग्लंडचा डाव 207 धावांवर संपुष्टात आला.जो सामना अनिर्णित ठरणार होता तो सामना भारतीय गोलदांच्या सर्वोत्तम कामिगिरीने जिंकण्यात भारताला यश आले. रवींद्र जडेजाने यावेळी दमदार कामगिरी करत सात विकेट्स मिळवले त्यांना अमित मिश्रा, उमेश यादव आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी एक गडी बाद करत मोलाची साथ दिली. सामन्यात त्रिशतकी खेळी करणारा करुण नायर सामनावीराचा मानकरी ठरला, तर कर्णधार विराट कोहलीला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
या सामन्यातील विजयासह भारताने ऐतिहासिक विजयाची नोंद केली.कसोटी क्रिकेटच्या 84 वर्षांच्या इतिहासात भारतानं पहिल्यांदाच इंग्लंडवर 4-0 इतक्या मोठ्या फरकानं विजय मिळवला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाने प्रथमच इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 4-0 अशा फरकाने जिंकण्याची किमया साधली आहे. याआधी 1993 साली भारताने इंग्लंडला 3-0 अशा फरकाने नमवले होते. तसेच 4-0 अशा फरकासह मालिका जिंकण्याची भारताची ही दुसरी वेळ आहे. याआधी 2013 साली भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारताने 4-0 अशा फरकाने विजय मिळवला होता. 1932 सालापासून भारतीय संघ आजवर 152 कसोटी मालिकांमध्ये खेळला आहे. त्यात केवळ दुसऱ्यांदाच भारतानं 4-0 असा विजय मिळवला आहे.एका डावात 400 हून अधिक धावा फटकावल्यानंतरही संघाला डावाने पराभूत व्हावे लागण्याचा प्रसंग कसोटी क्रिकेटमध्ये चार वेळा घडला आहे. मात्र एकाच मालिकेत डावात चारशेहून अधिक धावा फटकावूनही दोनवेळा डावाने पराभूत होण्याची नामुष्की ओढवणारा इंग्लंड हा पहिलाच संघ आहे.
भारताला या मालिकेतून करून नायर जयंत यादव यांच्या रूपात दोन प्रतिभावंत खेळाडू भेटले आहेत . या दोन खेळाडूंकडून सर्वाना भविष्यात पुन्हा एकदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल तसेच भारताने इंग्लंड विरुद्धच्या या पाच सामन्यांच्या मालिकेत मिळवलेला हा विजय युवा संघाचा विजय असून विराट च्या नेतृत्वात खेळणाऱ्या या संघाकडून जगातील इतर ठिकाणी ही अशाच कामगिरीची अपेक्षा सर्वाना आहे.


Comments
Post a Comment