वेब सीरीज रुद्र द एज ऑफ डार्कनेस का ट्रेलर रिलीज(“Rudra - The Edge of Darkness"). इस वेब सीरीज से अजय देवगन (Ajay Devgn, Digital Debut) कर रहे हैं डिजिटल डेब्यू. रुद्र में अजय एक बार फिर कॉप लुक में नजर आ रहे हैं . अजय के अलावा में राशि खन्ना (Raashi Khanna), ईशा देओल (Esha Deol), अतुल कुलकर्णी, अश्विनी कालसेकर, तरुण गहलोत, आशीष विद्यार्थी और सत्यदीप मिश्रा प्रमुख भूमिकाओं में नज़र आएंगे. ‛रुद्र- द एज ऑफ डार्कनेस’ ब्रिटिश वेब सीरीज ‘लूथर’ की रीमेक है. ('Rudra - The Age of Darkness' is a remake of the British web series 'Luther'.)
धोनी हे कधीच विक्रमांच्या मागे धावत नाहीत म्हणून विक्रम त्यांच्या मागे धावत असतात याचा प्रत्यय पुन्हा सर्वांना पाहायला आणि अनुभवायला मिळाला . सर्वात यशस्वी कर्णधार, ज्यांनी भारताला दोन विश्वचषक जिंकून दिले त्या महेंद्रसिंग धोनीनां अखेरचे नेतृत्व करताना पाहण्याचा विलक्षण योग अनुभवण्यासाठी ब्रेबॉर्न स्टेडियमवर मंगळवारी क्रिकेटरसिकांची एकच गर्दी लोटली होती. ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरु असलेला भारत ‘अ’ विरुध्द इंग्लंड सराव सामना ऐन रंगात असताना पहिल्या डावातील 46 वे षटक झाल्यानंतर एका धोनी चाहत्याने सुरक्षाजाळीवरुन उडी मारुन मैदानात धाव घेतली. यावेळी खेळपट्टीवर असलेल्या धोनी - पांड्या यांचेही लक्ष वेधले गेले. या चाहत्याने खेळपट्टीवर येताच धोनीच्या पाया पडल्या आणि त्यांच्याशी हस्तांदोलन केले. या चाहत्याला लगेच मैदानाबाहेर काढण्यात आलं.मैदानाबाहेर नेत असताना क्रिकेटप्रेमींमध्ये मात्र तो हीरो ठरला होता.
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा हा शेवटचा सामना पाहण्यासाठी क्रिकेटरसिकांनी मोठी गर्दी केली होती . टीम इंडियाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या सामन्यात भारत ‘अ’ संघाचं नेतृत्त्व करत होते . एका आंतरराष्ट्रीय संघाविरुद्ध भारतीय संघाचा कर्णधार म्हणून धोनी यांचा हा अखेरचा सामना होता . त्यामुळं या सराव सामन्याला दहा हजारांहून अधिक क्रिकेटरसिकांनी उपस्थिती लावली होती . महत्वाचं म्हणजे आजचा हा सराव सामना सर्वांसाठी विनामूल्य़ ठेवण्यात आला होता .
सामन्यापूर्वी क्रिकेट क्लब ऑफ इंडियातर्फे (सीसीआय क्लब) धोनीनां सन्मानचिन्ह देऊन हृद्य सत्कार करण्यात आला. नाणेफेकीला जेव्हा धोनी मैदानात अवतरले तेव्हा क्रिकेटरसिकांनी स्टेडियम डोक्यावर घेतले होते. त्या वेळी क्रिकेटरसिकांना फक्त ईस्ट स्टॅण्डमध्येच सोडले जात होते. क्रिकेटरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता त्यानंतर नॉर्थ स्टॅण्ड आणि वेस्ट स्टॅण्डही चाहत्यांसाठी खुले करण्यात आले. पण तरीही गर्दी वाढत होती. २५ हजार क्षमता असलेले ब्रेबॉर्न स्टेडियम बऱ्याच वर्षांनी क्रिकेटरसिकांच्या उपस्थितीने उजळून निघाले.
या सामन्यात क्रिकेटरसिकांना धोनी यांची फलंदाजी पाहण्यासाठी ४१व्या षटकापर्यंत वाट पहावी लागली. ४१व्या षटकात अंबाती रायुडू १०० धाव बनवून निवृत्त झाले आणि धोनी मैदानात आले. यावेळी क्रिकेटरसिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे ‘सारे काही माही.. माही..’ असेच वातावरण झाले होते.
अखेरच्या षटकात फटकेबाजी करण्यासाठी धोनी जगप्रसिद्ध आहेत . या सामन्यातही तेच पाहायला मिळाले. अखेरचे षटक टाकण्यापूर्वी ते ४५ धावांवर खेळत होते . त्यानंतरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावत दिमाखात अर्धशतकाला गवसणी घातली. त्यानंतरही दोन चौकार आणि एक षटकारासह त्यांनी एकूण २३ धावा वसूल केल्या. निर्धारित षटके संपल्यावर धोनी परतत असताना चाहत्यांनीही त्यांचा निरोप घेतला आणि त्यानंतर जवळपास अर्धे स्टेडियम रिकामे झाले.भारताचे सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना विजय साजरा करताना पाहण्याचं मुंबईकर चाहत्यांचं स्वप्न अधुरंच राहिलं. धोनीच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या भारत ‘अ’ संघावर इंग्लंडनं तीन विकेट्स आणि सात चेंडू राखून मात केली.मात्र महेंद्रसिंह धोनी यांनी त्यांच्या आक्रमक खेळीने नेतृत्वाने सगळ्यांची मनं जिंकली.महेंद्र सिंग धोनी हे क्रिकेट इतिहासातील पहिले असे कर्णधार आहेत ज्यांच्या कर्णधार पदातील सराव सामना लाइव्ह दाखवण्यात आला

Comments
Post a Comment