वेब सीरीज रुद्र द एज ऑफ डार्कनेस का ट्रेलर रिलीज(“Rudra - The Edge of Darkness"). इस वेब सीरीज से अजय देवगन (Ajay Devgn, Digital Debut) कर रहे हैं डिजिटल डेब्यू. रुद्र में अजय एक बार फिर कॉप लुक में नजर आ रहे हैं . अजय के अलावा में राशि खन्ना (Raashi Khanna), ईशा देओल (Esha Deol), अतुल कुलकर्णी, अश्विनी कालसेकर, तरुण गहलोत, आशीष विद्यार्थी और सत्यदीप मिश्रा प्रमुख भूमिकाओं में नज़र आएंगे. ‛रुद्र- द एज ऑफ डार्कनेस’ ब्रिटिश वेब सीरीज ‘लूथर’ की रीमेक है. ('Rudra - The Age of Darkness' is a remake of the British web series 'Luther'.)
वसुधैव कुटुम्बकम या विचारधारेविषयी व संस्काराविषयी बोलताना भारतातील प्रत्येक व्यक्ती आदर व्यक्त करतो . पंतप्रधान नरेन्द्र मोदी ही जागतिक व्यासपीठावर वसुधैव कुटुम्बकम या विचारधारेविषयी व संस्काराविषयी बोलले आहेत, त्याबद्दल नरेन्द्र मोदी यांची प्रशंसा करण्यात आली आहे.
वसुधैव कुटुम्बकम या बद्दल कोणाला ही विचारले असता सर्वजण हेच म्हणतात कि या संस्काराने व विचाराने आपण सर्व एक दुसऱ्यांशी जोडले गेलो आहोत पण आज अशी स्थिती निर्माण झाली आहे कि वसुधैव कुटुम्बकम या विचारधारेचा व संस्काराचा सर्वांना विसर पडत चालला आहे. आज प्रत्येक जण एक व्यक्ती म्हूणून न जगता एक खास धर्माचा ,जातीचा , पंथाचा म्हणून जगत आहे. लोकांना या बद्दल विचारले असता म्हणतात कि मी तसा नाही बाकी लोक तसे आहेत. सर्वजण एक दुसऱ्यांना दोष देतात पण हे विसरतात कि लोक म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपणच आहोत. समाजातील वैचारिक लोक अशी ओळख असणारे लोकही कोणता ही विचार न करता स्वतःसोबत लोकांना भ्रमित करतात आणि धर्म, जात, पंथ, भाषा, प्रदेश यावरून लढवतात. लोकसुद्धा कोणतीही शहनिशा न करता या वैचारिक म्हणवणाऱ्या लोकांवर विश्वास ठेऊन लढतात. यात नुकसान होते ते संपूर्ण जीवसृष्टीचे, नैतिक मूल्यांचे आणि विचारांचे.
पृथ्वीवरील या सुंदर अशा जगाला लोकांनी देश या गोष्टीत विभागले आहे. इथे भारताला प्रदेश म्हणून लिहणे योग्य वाटते. भारत हा प्रदेश नेहमीच पृथ्वीवरील बदलांचे प्रतिनिधित्व करत आला आहे . इथल्या भूमीतील विचार हे सर्वांना योग्य मार्गदर्शन करतात. या भूमीने बाबासाहेब आंबेडकर , महात्मा गांधी, भगत सिंग, छत्रपती शिवाजी महाराज, टिपू सुलतान , अकबर अशा अनेक नायकांचे नेतृत्व दिले. पण आज भारत भूमी या नेतृत्व गुणांना गमावून बसली आहे. या वर नमूद केलेल्या लोकनेतृत्वाचा इतिहास राजकीय लोक , प्रसारमाध्यमे, कार्यक्रम वाहिन्या चुकीच्या पद्धतीने दाखवतात आणि चुकून कोणी या चुकीच्या इतिहासावर प्रश्न निर्माण केला तर राजकीय लोक, प्रसारमाध्यमे, कार्यक्रम वाहिन्या हे सर्व मिळून प्रश्न निर्माण करणाऱ्याला वाईट ठरवतात आणि लोकसुद्धा कोणताही विचार न करता राजकीय लोक , प्रसारमाध्यमे, कार्यक्रम वाहिन्या याप्रमाणे न्यायाधीश बनून निर्णय देतात. आज समाजात धर्म, जात, पंथ, भाषा, प्रदेश यावरून होणारी हिंसा त्याचा प्रत्यय आहे.लोक स्वतःची ओळख हिंदू - मुस्लिम -इसाई -शीख -जैन इ. अशी करून देतात. खूप कमी जण असतात जे जीव म्हणून जगतात. स्वतःची ओळख धर्म , जाती , पंथ यावरून करून देणाऱ्या लोकांची आणखी एक बाब म्हणजे ते नेहमी सांगतात कि देव एक आहे व प्रत्येक धर्म व देवाचे विभिन्न रूप शांतीचा संदेश देतो. पण काही जणांनी या देव, धर्म , जाती वरून प्रश्न निर्माण केला कि लोक वाद व हिंसा करतात आणि म्हणतात आम्ही हिंसा करत नाही. सध्याच्या आधुनिक म्हणवणाऱ्या या जगात सोशल मीडियावर कोणी देवाला, धर्माला अनुसरून काही लिहले कि त्याचे वर्गीकरणं करतात आणि सोशल मीडिया वर ज्या ग्रुप मध्ये असतात त्या लोकांना म्हणतात कि सामाजिक तेढ निर्माण होईल असे काही लिहू नका. हे लोक जर खरोखर वैचारिक आहेत तर तेढ निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही. देव, धर्म,जाती या गोष्टींनी माणसाला एक दुसऱ्यापासून दूर केले आहे त्यामुळे या गोष्टी नष्ट करण्यासाठी लोकांनी एकत्र येणे गरजचे आहे पण असे होत नाही. याची काही उदाहरणे आहेत.
कोपर्डीत लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती यामुळे या घटनेत स्त्री हक्कासाठी लढणे आवश्यक होते पण मूळ मुद्दा हटवून त्याला एका समाजाचे, जातीचे नाव देण्यात आले. लोक हे विसरले कि गुन्हेगाराने जात , धर्म पाहून अत्याचार केला नव्हता तर त्याच्या वाईट प्रवृत्तीने त्याने अत्याचाराचा गुन्हा केला होता. कोपर्डी घटनेला मराठा आंदोलन बनवून प्रत्येक जागी मूक मोर्चा , आंदोलन करण्यात आले. मूक आंदोलन ठीक आहे पण आंदोलनाला एका समाजाशी , जातीशी जोडून आंदोलन करणे योग्य नाही. ज्या शिवाजी महाराजांचे नाव गर्वाने घेतले जाते ते जर असते तर त्यांना ही समाजाची आजची परिस्थिती पाहून वाईट वाटले असते. या शिवाय आणखी काही उदाहरणे - हिंसक जाट आंदोलन, गायीला माता ठरवून लोकांना मारहाण, देशभक्ती दाखवण्यासाठी राष्ट्र्गीतला उभे राहण्याची सक्ती. संस्कृती च्या नावाखाली जल्लीकट्टूचे हिंसक आंदोलन. त्याच्या पाठोपाठ आता देशात विविध ठिकाणी बैलगाडी शर्यत आणि अशा प्रकारच्या इतर गोष्टीसाठी आंदोलन होऊ लागले आहे. या अशा घटनांनी भारतातील लोकशाहीला धक्का लागला आहे. या बद्दल बोलले तर दुसऱ्या देशाशी तुलना करून गप्प बसवण्याचा प्रयत्न केला जातो आणि वाद नको म्हणून काही लोक शांत राहतात.
भारतात फक्त म्हणण्यासाठी लोकशाही आहे पण अस्तित्वात अराजकता आहे. देश, संस्कृती, भाषा, यांच्या नावाखाली संपूर्ण जगात नग्न नाच सुरु आहे आणि भारत ही त्याचे प्रतिनिधित्व करत आहे. प्रत्येक जीवासाठी देण्यात आलेली पृथ्वी आणि पृथ्वीवरील ठिकाणे देव, जात, देश , संस्कृती, भाषा यामुळे खराब झाली आहेत. वेळीच जर देव, जात, देश , संस्कृती , भाषा यावरून विनाश थांबला नाही तर आणखी घातक परिणाम सर्वांना पाहावे आणि सहन करावे लागतील. भारतातील वसुधैव कुटुम्बकम ही विचारधारा व हे संस्कार बोलण्यात राहू नयेत. वसुधैव कुटुम्बकम ही विचारधारा, ही संस्कृती पुन्हा एकदा अस्तित्वात आणून सुंदर विश्व निर्माण करण्याची जबाबदारी भारताची आहे. त्यामुळे देव, जात, देश , संस्कृती , भाषा यावरून होणारा विनाश थांबवण्याची सुरुवात भारताला पुन्हा एकदा करावी लागणार आहे.

Comments
Post a Comment