वेब सीरीज रुद्र द एज ऑफ डार्कनेस का ट्रेलर रिलीज(“Rudra - The Edge of Darkness"). इस वेब सीरीज से अजय देवगन (Ajay Devgn, Digital Debut) कर रहे हैं डिजिटल डेब्यू. रुद्र में अजय एक बार फिर कॉप लुक में नजर आ रहे हैं . अजय के अलावा में राशि खन्ना (Raashi Khanna), ईशा देओल (Esha Deol), अतुल कुलकर्णी, अश्विनी कालसेकर, तरुण गहलोत, आशीष विद्यार्थी और सत्यदीप मिश्रा प्रमुख भूमिकाओं में नज़र आएंगे. ‛रुद्र- द एज ऑफ डार्कनेस’ ब्रिटिश वेब सीरीज ‘लूथर’ की रीमेक है. ('Rudra - The Age of Darkness' is a remake of the British web series 'Luther'.)
भारतीय लोकशाहीचा नाच
लोकशाही या शब्दाचा उच्चार होताच एक शक्तीचा अनुभव होता. तसेच एक आशेचा किरण असल्याचा प्रत्यय ही येतो. लोकशाही हा एक घटक किंवा हक्क ,मूल्य असाही अर्थ होतो. हा मानवी जीवनाच्या इतिहासाबद्दल अनेक बाबी स्पष्ट करतो आणि मानवाच्या वर्तमानाचाही घटनाक्रम सांगतो पण नेमकी लोकशाही म्हणजे काय ? लोकशाहीचा जीवनावर कसा प्रभाव पडतो ? या अनेक गोष्टी सांगण्याची गरज नाही कारण आजचा समाज हा इतका आधुनिक आहे कि त्याला याची माहिती आहे. समाजातील कोणत्याही व्यक्तीस विचारले तरी लोकशाही बद्दल नक्कीच सांगेल.
लोकशाही ही काही वस्तू नाही, खेळ नाही तर लोकशाही एक समाजव्यवस्था आहे जी सर्वाना समान असल्याची जाणीव करून देते.
लोकशाही एक बदल, विचार आणि हक्क आहे.
लोकशाही म्हणजे लोकांचे शासन. हा कोणत्याही देशाच्या ,राष्ट्राच्या , समाजाचा भाग आहे , जो देशाचे वर्तमान भविष्य आधारित करतो, विकास आधारित करतो. लोकशाहीचे उदाहरण द्यायचे असेल तर भारत हा सर्वात लोकप्रिय देश आहे. भारताच्या लोकशाहीला संपूर्ण पृथ्वीवरीळ देशांकडून आदर दिला जातो. भारतीय लोकशाहीचे तीन स्तंभ आहेत ती तीन स्तंभच भारतीयांची विचारशैली ,जीवनशैली स्पष्ट करतात भारतीय लोकशाहीची ही स्तंभ पुढीलप्रमाणे आहेत (१)कार्यपालिका (२)न्यायपालिका
(३) विधिमंडळ
या तीन स्तंभाच्या आधारे भारताकडे जगाचे मार्गदर्शन , नेतृत्व करण्याचे सामर्थ्य आहे. या लोकशाहीचा प्रत्येकाला आदर ,अभिमान आहे. हे सगळे बोलताना , ऐकताना किती छान वाटते ना !! असे असताना इथे आणखी एक गोष्ट स्पष्ट आहे तिचा विचार करण्याची सुद्धा आज गरज निर्माण झाली आहे, जसे एका नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे भारतीय लोकशाहीला धक्का पोहोचवणारे घटक सुद्धा आहेत ,ते घटक दुसरे काही नसून कट्टरता आणि हिंसा हे आहेत. कट्टरता म्हणजे फक्त एका विचारसरणीनुसार चालणे तर िहंसा म्हणजे लोकाचे जीवन नष्ट करणे. हिंसा ही अशी वृत्ती आहे जी कट्टरता या विचारामुळे निर्माण होते. कट्टरता आणि हिंसा यांचे आहे संपूर्ण सृष्टीवरील प्रमाण वाढत चालले आहे. पण सध्या फक्त भारतावर लक्ष देऊया भारतात कट्टरता आणि हिंसा याची अनेक उदाहरणं आहेत. वैचारिक समानता नसल्यामुळे प्रत्येकाला असे वाटते कि आपल्या विचाराशी सहमत नाही म्हणजे तो व्यक्ती चुकीचा आहे. या गैरसमजुतीमुळे लोकांना दूर करण्याचे काम कट्टरता आणि हिंसा करते . कट्टरता आिण िहंसा यांचा िवनाशक परिणाम याबाबतीत म्हणजेच धार्मिक गोष्टीच्या बाबतीत आणि समाजातील महत्वपूर्ण व्यक्तीच्या प्रभावाच्या बाबतीत जास्त असतो.
धर्माबद्दल विचाराल तेव्हा आस्तिक व नास्तिक असे वर्गीकरण केले जाते परंतु आस्तिक व नास्तिकचा मूळ अर्थ वेगळा आहे. आस्तिकतेचा खरा अर्थ स्वतावर विश्वास असणारा असा आहे तर नास्तिकतेचा अर्थ स्वतावर विश्वास नसणारा असा आहे. ९९% लोक असे सांगतात कि देव एक आहे हेच प्रत्येक धर्म सांगतो.याव्यतिरिक्त हे ९९% असेही सांगतात की प्रत्येक धर्म शांततेचा आणि प्रेमाचा संदेश देतो पण जेव्हा १ % टक्के लोक या ९९ % टक्के वाल्या लोकांना धर्म , देवाच्या नावावर होणाऱ्या वाईट गोष्टीबद्दल प्रश्न विचारतात तेव्हा हे ९९%लोक आक्रमक होतात व प्रश्न विचारणाऱ्या लो
याव्यतििरक्त काही वेळेसच नाही तरी अनेक वेळा समाजासाठी घातक ठरत असलेल्या धार्मिक घटनांना काही जणांनी थांबवण्याचा प्रयत्न वैचारिकतेच्या मार्गानी केला , त्यामुळे या िवचारवंतांच्या हत्या करण्यात आल्या असल्याच्या दुखद घटना घडल्या आहेत.
डॉ नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, एम एम कलबुर्गी यासारख्या विचारवंताची हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे संपूर्ण देशाला अपमान सहन करावा लागला. यानंतर ही काही बदल झाला नाही. समाजात उपस्थित असलेले कट्टर विचार वारंवार समाजाचे संतुलन बिघडवत आहेत ,परंतु स्वताला आधुनिक म्हणणारा समाज स्वताला एका धर्माचा ,एका जातीचा मानूनच जगतो आणि यावर भावनात्मक होतो. माणूस म्हणून जन्म झाल्यावर आपण मृत्यू पर्यंत काय करतो हेच आपली ओळख असते हे माणूस विसरला आहे. माणूसपणा हरवला आहे हे समाज स्वीकारत सुध्दा नाही हे आणखी त्रासदायक आहे. धार्मिक कट्टरता आणि देवाच्या नावावर झालेली हिंसेची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत. १) बाबरी मस्जिद २) गोधरा कांड ३) उनामध्ये जातीच्या नावाखाली झालेली मारहाण. या घटना ताज्या असतानाच कोपर्डीच्या बलात्काराच्या घटनेला लोकांनी मराठा या जातीशी जोडून वाईट कृत्याचे जातीय वर्गीकरण करून मूळ घटनाच बदलली व िवषय ही बदलला.
खरे पाहता धर्म ,जाती,पंथ या गोष्टीमुळे सर्वांचे नुकसान झालॆ आहे. जाती धर्म हे आपल्यासाठी घातक ठरत आहेत व यातून मुक्त होणे गरजेचे आहे. हे जेव्हा घडले म्हणजे कि ज्यावेळी लोक धर्म ,जातीपासून मुक्त होऊन एक व्यक्तीच्या आधारे जगतील आणि आपली कर्तव्य पार पडतील तेव्हा हे देशासाठी आणि संपूर्ण सृष्टीसाठी योग्य होईल.
सामाजिक गोष्टीचा गैरवापर आणि सत्तेचा गैरवापर यांचा ही सध्या संबंध साधला जातो आहे. यामध्ये मीडिया आपले योगदान देतो आहे. राजनीती , स्वताला िवचारवंत म्हणारे लोक आणि मीडिया ठरवत आहेत कि देशभक्त कोण आहे आणि समाजातील ९९ % टक्के लोक काही िवचार न करता राजनीतीक ,स्वताला िवचारवंत म्हणत असलेल्या आणि मीडियाच्या गोष्टीवर लगेच विश्वास ठेवतात आणि प्रतिक्रिया देतात उदा.आिमर खानच्या असहिष्णुतेच्या मुद्दावरील प्रक्रियेने आक्रामक झालेले लोक हे एक मोठे उदाहरण आहे. या उदाहरणा व्यतिरिक्त आणखी काही उदाहरणे -पाकिस्तानी कलाकारांना समर्थन-विरोध ,एनडीटीव्ही वर घातलेली एका िदवसाची बंदी, जेएनयू प्रकरण यावरून कळते कि मीडिया आपली मूळ ओळख सोडून फक्त रुपयांसाठी काम करणारा बनला आहे.
सत्य गोष्टी लोकांसमोर आणणे विसरत चालला आहे व न्यायधीश असल्यासारखा निर्णय देत आहे. हे सर्व काम ९०% संख्या असलेले मीडिया, समाज ,राजनीती हे घटक करत आहेत.
त्यामुळेच हे सर्व थांबवायचे असेल तर आपल्याला स्वताहून याची सुरवात करावी लागेल सुरवात करायची म्हणजे कि कोणत्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही. धर्म ,जाती ,रीती रिवाज यांच्या ज्या खोट्या कल्पना आहेत त्यापासून मुक्त व्हायचे त्यांची ही शहानिशा करायची.
एक -दुसऱ्याशी सुसंवाद साधायचा मतभेद असल्यामुळे हिंसेचा सहारा घेण्याऐवजी खरं सत्य समोर ठेवून खोट्या गोष्टी दूर करायच्या असे केल्यास समाजाची प्रगती होईल आिण भारत आणखी चांगल्या गतीने प्रगतीच्या मार्गावर जाईल आणि सुंदर राष्ट्र बनेल.
अशा प्रकारे भारतापासून सुरूवात होऊन संपूर्ण सृष्टी मनमोहक बनण्यास सुरू होईल.
Comments
Post a Comment