भारतीय समाज हा लोकशाही वर आधारित आहे. बाबासाहेब यांनी भारतीय व्यवस्थेला राज्य घटना देऊन संपूर्ण देशाला एकत्र आणले त्यांच्याकडून देण्यात आलेल्या घटनेमुळे प्रत्येक नागरिकाला अनेक अधिकार मिळेल जे नागरिकाना त्याचा अधिकार असून मिळत नव्हते . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, न्याय व सहजीवनावर आधारित समाज अभिप्रेत होता. त्यामुळे त्यांनी सर्वाना समान वागणूक देणारी राज्यघटना व समान वागणूक देणारे संविधान समाजाला दिले.पण आज या संविधान ला बदलून आण्याचा काही लोकांकडून प्रयत्न केले जातो आहे. आज अचानक सर्वत्र अतिरेकी राष्ट्रवादाची भुते नाचू लागल्याने राज्यघटनेची शाबूतता कधी नव्हे एवढी आवश्यक बनलेली आहे.
समाज हा राष्ट्राचा भाग असतो आणि त्या राष्ट्राची धारणा करते ती लोकशाही व्यवस्था. तिचीही विविध रूपे आहेत. कुठे ती संसदीय असते, कुठे अध्यक्षीय, तर कधी संसदीय मुखवटय़ातील अध्यक्षीय. कुठेही ती परिपूर्ण नाही. अनेक त्रुटी तिच्यातही आहेत. तिच्यात नेहमीच सुधारणेला वाव असतो. आणि महत्त्वाचे म्हणजे ती सुधारू शकते. हुकूमशाहीत ती संधीच नसते. शिवाय संपूर्ण मानवी इतिहासात याहून अधिक चांगली व्यवस्था आपण शोधू शकलेलो नाही. किंबहुना रामराज्यनामक ज्या युटोपियाची- आदर्शलोकाची- कल्पना समाजमनावर नेहमीच राज्य करीत असते, ती साकारण्याचे सर्वोत्तम माध्यम आहे ती लोकशाहीच. लोकशाही धर्म नसून व्यवस्था आहे व राज्यघटना धर्मग्रंथ नसून लोकशाही अंगाचा भाग आहे.पण आज या संविधान ला बदलून आण्याचा काही लोकांकडून प्रयत्न केले जातो आहे. आज अचानक सर्वत्र अतिरेकी राष्ट्रवादाची भुते नाचू लागल्याने राज्यघटनेची शाबूतता कधी नव्हे एवढी आवश्यक बनलेली आहे.
घटनेतील काही तरतुदी निरस्त होऊ शकतात, काही बदलू शकतात, हे समजण्याची सहिष्णुता आपणही बाळगली पाहिजे. परंतु त्यातही एक अट आहे. ती म्हणजे घटनेच्या चौकटीची. घटनाकारांनी उद्देशिकेतून, नागरिकांच्या हक्कांतून ती आखून दिली आहे. तिचा भंग होता कामा नये.
आज घटनेत बदल म्हटले की अनेकांचे मेंदू झिणझिणतात, विरोधासाठी बाहू फुरफुरतात. प्रत्येक गोष्टीला दैवत्व बहाल करण्याची आपली सवय. आपण राज्यघटनेलाही तसे दैवत्व देऊ पाहात आहोत. जणू ती धर्म व अन्य धर्मग्रंथांप्रमाणे अपरिवर्तनीयच.
आपल्या राष्ट्रपुरुषांची तशी भावना असती, तर त्यांनी घटनेत सुधारणेच्या तरतुदीच ठेवल्या नसत्या. पण त्या आहेत. याचे कारण घटना लोकांची आहे, लोकांसाठी आहे. त्यांच्या आशा, आकांक्षा, विचार, आचार काळानुसार बदलतात. त्या काळाबरोबर राहायचे असेल तर घटनेलाही लवचीक असणे गरजेचे आहे, हे संविधानसभेला समजले होते. तेव्हा घटनेतील काही तरतुदी निरस्त होऊ शकतात, काही बदलू शकतात, हे समजण्याची सहिष्णुता आपणही बाळगली पाहिजे. परंतु त्यातही एक अट आहे. ती म्हणजे घटनेच्या चौकटीची. घटनाकारांनी उद्देशिकेतून, नागरिकांच्या हक्कांतून ती आखून दिली आहे. तिचा भंग होता कामा नये. केल्यास तो घटनाद्रोह होईल. सावधगिरी बाळगायची ती त्यापासून. कारण हा विरोध टपूनच बसलेला आहे. तो कधी धर्मवादाच्या वेशात असतो, तर कधी जातीय आणि प्रांतिक अस्मिता अहंकारांच्या रूपात असतो. तो कधी गुणवत्तावादाचे गोडवे गात येतो, तर कधी सांस्कृतिक राष्ट्रवादाचा गणवेश घालून येतो. घटनेच्या उद्देशिकेतील धर्मनिरपेक्ष या शब्दाला आक्षेप घेणाऱ्या शक्ती हल्ली चेकाळल्या आहेत. हे एका धर्माचे राष्ट्र व्हावे ही त्यांची मागणी. ‘देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे,’ अशी प्रतिज्ञा पाठ करून आपण विसरलो आहोत. त्या प्रतिज्ञेला, परंपरेला, देशाच्या एकात्मतेला दिलेले हे आव्हान आहेच, पण तो राज्यघटनेवरील थेट हल्लाही आहे. कारण त्यात घटनेची चौकट उद्ध्वस्त करण्याची आस आहे. धर्म , जाती वरून वर्गीकरण करून विभाजन करण्याचे काम सुरु आहे त्यामुळे न्याय स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या चार खांबांवर उभी असलेली लोकशाही व राज्यघटना चे खांबच उलथून पडण्याची भीती आहे. म्हणून हे खांब जपायचे आहेत .या खांबांच्या अस्तित्वावरच राज्याहून व्यक्तीचे मोठेपण अवलंबून आहे, याचे उदाहरण म्हणजे भारतीय समाजाच्या प्रगतीत अडथळा ठरणारी जात उद्ध्वस्त करावयाची तर जात जाणीव नष्ट झाली पाहिजे आणि जात जाणीव संपवायची तर समाजात आंतरजातीय विवाह जसे झाले पाहिजेत तसेच जातीची भावना मनावर ठसविणाऱ्या धर्मग्रंथांचे पावित्र्यही नाकारले पाहिजे, अशी बाबासाहेबांची जाती निर्मूलनविषयक भूमिका होती व त्यांनी त्या दृष्टीने काम केले. लोकांना राज्यघटनेत अधिकार दिले. बाबासाहेबानी दिलेल्या या राज्य घटनेटसाठी त्यांचे जितके आभार मानावे तितके कमीच.
आज जगभरात राष्ट्रवादाच्या नावाने भावनात्मक बनवून विनाशक कृत्य होऊ लागली आहेत. लोकशाहीवर हल्ले होऊ लागले आहेत , त्यामुळे या हल्ल्यांना परतवण्याची जबाबदारी आपली आहे. लोकशाही व्यवस्थेची जी तत्वे आपण विसरत चाललो आहोत त्या लोकशाही तत्वांना अमलात आणून आपण सर्वजण पुन्हा एकदा लोकशाही बळकट करू शकतो आणि न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या चार खांबांवर उभ्या राहणाऱ्या समूहाची ,समाजाची निर्मिती करू शकतो. आपल्या लोकशाहीला व लोक नेत्यांना आपल्याकडून देण्यात आलेला तो आदर असेल.
शेवटी पुन्हा एकदा बाबासाहेब रामजी आंबेडकर याना खूप खूप धन्यवाद.
Comments
Post a Comment