वेब सीरीज रुद्र द एज ऑफ डार्कनेस का ट्रेलर रिलीज(“Rudra - The Edge of Darkness"). इस वेब सीरीज से अजय देवगन (Ajay Devgn, Digital Debut) कर रहे हैं डिजिटल डेब्यू. रुद्र में अजय एक बार फिर कॉप लुक में नजर आ रहे हैं . अजय के अलावा में राशि खन्ना (Raashi Khanna), ईशा देओल (Esha Deol), अतुल कुलकर्णी, अश्विनी कालसेकर, तरुण गहलोत, आशीष विद्यार्थी और सत्यदीप मिश्रा प्रमुख भूमिकाओं में नज़र आएंगे. ‛रुद्र- द एज ऑफ डार्कनेस’ ब्रिटिश वेब सीरीज ‘लूथर’ की रीमेक है. ('Rudra - The Age of Darkness' is a remake of the British web series 'Luther'.)
नरेंद्र मोदी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान बनल्यापासून जागतिक संबंध सदृढ करण्यासाठी आणि भारताचा विकास करण्यासाठी अनेक प्रयत्न , उपाययोजना केल्या आहेत . जगातील लोकप्रिय आणि ताकतवर नेत्यांमध्ये नरेंन्द्र मोदी यांचे नाव घेतले जाते. सध्या काळा बाजार आणि काळ्या रुपयांवर नियंत्रण आणण्यासाठी नोट बंदी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने लोकांपासून , प्रसारमाध्यमाध्यमापासून , जगातील इतर देशांना ही आश्चर्याचा धक्का बसला. नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर ला रात्री ८वाजता अचानक ५००-१००० च्या नोटा बंदी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर लोकांनी मग त्याच दिवशी रात्री एटीएम बाहेर रुपये काढण्यासाठी रांग लावली. पण रुपयांचा साठा संपल्याने अनेकांना रुपये मिळाले नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून बँका आणि एटीएम बाहेर लोकांच्या रांगा वाढल्या . संपूर्ण देशात लोक नोटा बदली करण्यासाठी व जमा करण्यासाठी काही जण कामाला सुट्टी करून व काही जण उपाशी पोटी रांगेत उभे राहिले असल्याचे पाहण्यास मिळाले . नोटा बंदी च्या निर्णयाने देशाचे हित होणार आहे असे सांगण्यात आल्यामुळे लोकांनी ही चेहऱ्यावर हास्य ठेवत त्रास सहन करत रांगेत उभे राहिले व सरकारचे समर्थन केले . येथे ही गोष्ट सांगणे ही महत्वाचे आहे कि या निर्णयाला योग्य ठरवणारे भावनात्मक मॅसेज फॉरवर्ड होऊ लागले . सोशल मीडियाचा वापर लोक जास्त करत असल्याने नोट बंदी वरून लोकांना भावनात्मक करण्यासाठी याचा वापर झाला. पण येथे लोक हे विसरून गेले की नोट बंदीच्या या निर्णयाने आता या दहा दिवसात ३३ लोकांचा मृत्यू झाला आहे. लोकांच्या या मृत्यूबद्दल काही नेत्यांनी व पत्रकारांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली त्यामुळे त्यांना विकास विरोधी , देशविरोधी ठरवण्यात आले. पण हे योग्य नाही.एखाद्या निर्णयांने काही चांगले होत असेल तर त्याला समर्थन करणे ,निर्णय अमलात आणणे चुकीचे नाही, परंतु त्या निर्णयाने काही त्रास ,त्रुटी निर्माण झाल्यास त्याची पडताळणी करून तो त्रास ,त्रुटी दूर करणे ही आवश्यक असते. पण नरेन्द्र मोदी यांच्या कार्यकाळात असे होत नाही आहे. नरेंद्र मोदी सरकार व बीजेपी कडून प्रश्न विचारणाऱ्याचे , निर्माण करणाऱ्याचे मत जाणून न घेताच त्यांना राष्ट्रविरोधी ठरवण्याचा क्रम सुरु आहे . लोकशाही राष्ट्रासाठी हे घातक आहे. काही त्रुटी व समस्या असल्यास त्या जाणून घेऊन त्याचे उत्तर मोदी यांच्या सरकारने द्यायला हवे. असे असताना नरेंद्र मोदी यांचे मंत्री आणि बीजेपी मधील लोक नोटाबंदी च्या निर्णयाने भविष्यात फायदा होईल असे सांगत आहेत.पण कसा फायदा होईल हे मात्र सांगत नाहीत.
गुलाम नबी आझाद यांनी नोटा बंदी च्या निर्णयांने मृत्यू झालेल्या मृत व्यक्तींची तुलना उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांशी करून सत्य समोर आण्याचा प्रयत्न केला , त्यांच्या प्रयत्नाला बीजेपीच्या मंत्र्यांकडून चुकीचे असल्याचे सांगण्यात आले आणि गुलाब नबी आजाद यांच्या बदल तसे वातावरण निर्माण करण्यात आले. याव्यतिरिक्त टिव्ही पत्रकार आणि अँकर रवीश कुमार यांनी जेव्हा बँकेच्या बाहेर रांगेत नोटा जमा व बदली करण्यासाठी आलेल्या लोकांच्या समस्या आणि व्यथा जाणून घेण्याचा आणि ही माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांच्याशी वाईट वर्तवणूक करण्यात आली.
बीजेपी सरकार आल्यापासून वारंवार त्यांच्याविरुद्ध मत व्यक्त करणाऱ्या लोकांना वाईट ठरण्याचे , राष्ट्रविरोधी ठरवण्याचे काम सुरु आहे. हा पूर्णपणे अंधराष्ट्रवाद आहे. हा अंधराष्ट्रवाद विकासाकडे घेऊन जाणार नाही तर तो विकास करण्यापासून आपल्याला थांबवेल. जर नरेंद्र मोदी यांच्याकडून सहा महिने आधीपासून नोटा बंदी करण्याचे दृष्टीने काम सुरु होते तर रुपयांचा तुटवडा का निर्माण झाला ? , नोटांवर रघुराम राजन यांच्या सही ऐवजी उर्जित पटेल यांची सही कशी आली ?,भ्रष्ट लोकांची माहीत होती तर त्यांच्यावर कारवाई का केली नाही ? नरेंद्र मोदी सरकारने याची उत्तरे व माहिती देणे गरजेचे आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरुद्ध पक्ष यांनी आरोप -प्रत्यारोप , किंवा राजनीती न करता एकत्र मिळून लोकांसाठी काम करावे. शेवटी एक सत्य आहे कि या पृथ्वीवरील भारत या शहराचे आपण नागरिक असून भारता सोबत इतरांसाठी ही आपले काम प्रामाणिकपणे करून एक चांगले योगदान जागतिक अर्थव्यवस्थेसाठी द्यायचे आहे.

Comments
Post a Comment