वेब सीरीज रुद्र द एज ऑफ डार्कनेस का ट्रेलर रिलीज(“Rudra - The Edge of Darkness"). इस वेब सीरीज से अजय देवगन (Ajay Devgn, Digital Debut) कर रहे हैं डिजिटल डेब्यू. रुद्र में अजय एक बार फिर कॉप लुक में नजर आ रहे हैं . अजय के अलावा में राशि खन्ना (Raashi Khanna), ईशा देओल (Esha Deol), अतुल कुलकर्णी, अश्विनी कालसेकर, तरुण गहलोत, आशीष विद्यार्थी और सत्यदीप मिश्रा प्रमुख भूमिकाओं में नज़र आएंगे. ‛रुद्र- द एज ऑफ डार्कनेस’ ब्रिटिश वेब सीरीज ‘लूथर’ की रीमेक है. ('Rudra - The Age of Darkness' is a remake of the British web series 'Luther'.)
काळे धन आणि भ्रष्टाचार हे देशाला लागले कलंक व कीड आहे. या कलंकाला दूर करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला रात्री 8 वाजता अचानकपणे नोटबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला . या निर्णयाने काळ्या रुपयावर नियंत्रण येईल आणि देशासाठी सर्व काही चांगले होईल असे वातावरण तयार करण्यात आले . नरेंद्र मोदी यांनी यासाठी जनतेकडे 50 दिवस मागितले. नरेंद्र जी म्हणाले कि 50 दिवसात या नोट बंदीच्या निर्णयाने होणाऱ्या समस्या दूर होतील. या नोटबंदीच्या निर्णयानंतर सरकार आणि आरबीआय दररोज नवनवीन नियम लागू करू लागले पण देशासाठी लोक बँकेच्या रांगेत उभे राहिले व अजून ही उभे आहेत. 50 दिवस उलटून जाऊन सुद्धा समस्येची स्थिती कायम आहे पण नरेन्द्र मोदी हे स्वीकारायला तयार नाहीत की त्यांचा निर्णय चुकीचा आहे, उलट नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार हे भासवत आहे कि नोटबंदीला विरोध करणारे देश विरोधी आहेत.
मोदी यांच्या नोटबंदीने काळे रुपये ठेवणारे सुखी दिसत आहेत. काळे रुपये असणारे एखाद्या चित्रपटासारखे प्रदर्शित होत आहेत. नोटबंदीचा निर्णय चुकला आहे आणि त्यामुळे लोकांनी प्रश्न विचारू नये म्हणून मोदी व मोदी सरकार कॅशलेस व्यवहारांची गोष्ट करत आहेत. नोटबंदीच्या निर्णयाने अजून त्रास कमी झाला नसताना सरकारने हा निर्णय घेतला कि ज्यांच्याकडे 30 डिसेंबर नंतर 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा आढळतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, त्यांच्या कडून 5 पट दंड वसूल केला जाईल . तसेच 31 मार्च नंतर या जुन्या 500 आणि 1000 च्या नोटा आढळल्यास 4 वर्षांची शिक्षा होईल. सरकार काळे धन असणाऱ्यांवर नियंत्रण आणण्याच्या प्रक्रियेत विनाकारण जनतेचा बळी देत आहे . टीव्ही वर दोन - चार अशा लोकांची प्रतिक्रिया घेतली जाते जे नोटबंदीला समर्थन करत आहेत आणि या समर्थनाच्या आधारे असे दाखवले जाते कि लोक त्रास सहन करून नोटबंदीला समर्थन करत आहेत पण परिस्थिती अशी सुद्धा आहे कि काही लोकांना अजून नवीन रुपये मिळाले नाहीत.
काही लोक अजून सुद्धा बँकेच्या रांगेत उभे राहून नोट बदली होण्याची किंवा जमा होण्याची वाट पाहत आहेत. मोदी फक्त एक दोघांचे पंतप्रधान नाहीत तर सर्वांचे पंतप्रधान आहेत , त्यामुळे त्यांनी सर्वांच्या समस्येकडे लक्ष्य देणे आवश्यक आहे . नोटबंदीचा निर्णय योग्य असला तरी सध्या या नोटबंदीमुळे जी समस्या निर्माण झाली आहे, ती मोदी यांनी स्वीकारावी. फक्त 70 वर्षाचे उदाहरण देत बसून काँग्रेसला आणि इतर पक्षांना दोष देऊन स्वतःला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नये. काँग्रेस असो , नरेंद्र मोदी असो ,किंवा अन्य कोणी असो ,चुका प्रत्येकाकडून होतात आणि चुका सुधारता ही येतात हे सत्य आहे. म्हणूनच काँग्रेसला दोष देत बसण्यापेक्षा नरेन्द्र मोदी यांनी जनतेने त्यांना जी संधी दिली आहे त्याचा नीट वापर करावा. नरेंद्र मोदी यांनी जनतेची माफी मागावी व आरोप प्रत्यारोप करत बसण्यापेक्षा विरोधक व मोदी सरकार यांनी एकत्र येऊन नोटबंदीच्या समस्येचे उत्तर शोधावे. नोटबंदी निर्णयाने त्रस्त असलेल्या जनतेसाठी सरकार आणि विरोधकांनी एकत्र काम केल्यास त्यांना ही आनंद होईल.

Comments
Post a Comment