वेब सीरीज रुद्र द एज ऑफ डार्कनेस का ट्रेलर रिलीज(“Rudra - The Edge of Darkness"). इस वेब सीरीज से अजय देवगन (Ajay Devgn, Digital Debut) कर रहे हैं डिजिटल डेब्यू. रुद्र में अजय एक बार फिर कॉप लुक में नजर आ रहे हैं . अजय के अलावा में राशि खन्ना (Raashi Khanna), ईशा देओल (Esha Deol), अतुल कुलकर्णी, अश्विनी कालसेकर, तरुण गहलोत, आशीष विद्यार्थी और सत्यदीप मिश्रा प्रमुख भूमिकाओं में नज़र आएंगे. ‛रुद्र- द एज ऑफ डार्कनेस’ ब्रिटिश वेब सीरीज ‘लूथर’ की रीमेक है. ('Rudra - The Age of Darkness' is a remake of the British web series 'Luther'.)
नाशिक महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने आज भंगारबाजारात सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली आहे. आज सकाळी 9 वाजताच्या दरम्यान अंबड-सातपूर लिंकरोडवरील अतिक्रमित भंगारांची दुकाने हटविण्यास सुरवात झाली. यात जवळपास 800 पेक्षा जास्त दुकानं जमीनदोस्त झाली आहेत. या कारवाईवेळी महापालिकेनं मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवला होता.
गेल्या 17 वर्षांपासून नाशिकच्या अंबड लिंक रस्त्याच्या 100 एकरावरील 30 ते 40 एकर परिसरात भंगार मार्केट पसरलेलं आहे. बेकायदा दुकाने आणि कारखान्यांना खाली करण्याचे आदेश महापालिकेकडून देण्यात आले होते. यासाठी महापालिकेकडून वेळोवेळी मुदत वाढ दिली गेली. 2015 साली न्यायालयानं भंगार बाजार हलवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर भंगार बाजारातील दुकानांना पालिकेनं अनेक वेळा नोटीस बजावली होती. मात्र, या आदेशानंतरही या परिसरातील बेकायदा दुकाने, कारखाने हटवण्यात आली नाहीत.त्यामुळे 30 ते 40 एकर परिसरात पसरलेलं भंगार मार्केट आज पालिकेनं जमीनदोस्त केलं आहे. महापालिका इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे.
उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, पंजाब, गुजरात, राजस्थान तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातील व्यावसायीकांनी आपली दुकाने भंगार मार्केटमध्ये थाटली होती. जवळपास 20 हजार पेक्षा अधिक कामगार येथे काम करत होते.या कारवाईसाठी प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.यासाठी सुमारे एक हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. अंबड-लिंक रोडवर दोन्ही बाजूने बॅरीगेडस लावून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मोठ्या प्रमाणावर पोलीस फौज फाटा असल्याने परिसरास छावणीचे स्वरूप निर्माण झाले. जेसीबी, बुलडोजर, कंटेनर, अग्निशामक दलाची वाहने, ट्रक, टेम्पो यांच्या मदतीने ही मोहीम सुरु आहे. अतिक्रमित दुकांनांची संख्या येथे जास्त असल्याने ही कारवाई सात दिवस चालणार आहे. पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी येथे लक्ष ठेवून आहेत. तसेच या कारवाईचे ड्रोनच्या माध्यमातून चित्रिकरणही करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment